pm manmohan singh
pm manmohan singh
भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होईल असं लोकपाल विधेयक केंद्र सरकारनं तयार केलं. त्याबाबत कुणाचे मतभेद असतील तर सरकार चर्चेस तयार आहे असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं.
कोलकात्याच्या आयआयएममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली. या विधेयकाबाबत कुणाच्या हरकती असल्यास त्यांनी नियमानुसार त्या थेट स्थायी समितीसमोर मांडाव्यात असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान येथे दाखल झाले. त्यावेळी लोकपाल विधेयकावर सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. याआधीदेखाली पंतप्रधानांनी लोकपालच्या मुद्द्यावर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. आज त्याच प्रस्तावाचा पुनरुच्चार त्यांनी केला.