Monday, 22 August 2011

रविशंकर यांचे प्रयत्न निष्फळ!


अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या प्रयत्नानंतरही सरकार आणि टीम अण्णा यांच्यातील मतभेद अजूनही कायम आहेत. सरकारने दिलेला नवीन प्रस्ताव हा उत्साहवर्धक नाही, असे टीम अण्णाने दुपारीच जाहीर केले होते.

Anna & Shri Shri Ravishankar
Anna & Shri Shri Ravishankar
यापूर्वी रविशंकर यांनी सरकारचा एक अनौपचारिक प्रस्ताव घेऊन टीम अण्णांशी चर्चा केली. परंतु, अण्णांच्या सहकाऱ्यांनी हा प्रस्ताव सडेतोडपणे फेटाळला. हा प्रस्ताव उत्साहवर्धक नाही, असे टीम अण्णाने यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
सरकार आणि टीम अण्णांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही. सरकारला चर्चा करायची असल्यास त्यांनी आपले अधिकृत प्रतिनिधी पाठवावे, असे अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनी सांगितले.
किरण बेदी यांच्या या वक्तव्यानंतर सरकारने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

No comments:

Post a Comment