Saturday, 20 August 2011

दिल्ली मनपाची कुचराई, अण्णांचे १२०० समर्थक आजारी

सततच्या पावसाने रामलीला मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल झालाय. त्याची साफसफाई करण्यास दिल्ली मनपाचे कर्मचारी कुचराई करत आहे. त्यामुळे रामलीला मैदानात आतापर्यंत १२०० लोक आजारी पडले असल्याची माहिती आता समोर आली आहे.

Anna Hazare
Anna Hazare
दिल्लीच्या आयुक्तांनी यासंदर्भात स्वतः हस्तक्षेप करावा अन्यथा साथीचे  रोग पसरण्याची भीती अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. अरविंद केजरीवालांच्या या वक्तव्यानंतर दिल्ली महापालिकेला ताब़डतोब जाग आली.

रामलीला मैदानात मोठ्याप्रमाणात रेती आणि मुरूम टाकण्याचं काम सुरू झाले आहे. पण मोठ्याप्रमाणातला चिखल, डास यासगळ्याची अजिबात तमा न बाळगता अण्णांचे समर्थक रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

No comments:

Post a Comment