Monday, 22 August 2011

अण्णांसाठी तमिळ चित्रपट सृष्टीचे उपोषण

चेन्नई - सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात पाठिंबा दर्शविण्यासाठी तमिळ चित्रपट सृष्टी उद्या (मंगळवार) संपूर्ण दिवस उपोषण करणार आहे, अशी माहिती फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष एल. सुरेश यांनी पत्रकारांना दिली.

अण्णांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही माध्यमांची मदत घेत आहोत व तमिळ चित्रपट सृष्टीतील सर्वजणांना या एकदिवसीय उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत, असे एल. सुरेश यांनी सांगितले.

सर्व दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व तंत्रज्ञ यात सहभागी होतील असे सांगत "तमिळ फिल्म प्रोड्यूसर्स काऊन्सिल', 'फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साईथ इंडिया' तसेच "साऊथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन' अशा अनेक संस्था यात सहभागी होतील, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment