Janlokpal By Anna
A honest try to provide updates of "Janlokpal" to every Indian. !!! Vande Mataram !!!
Wednesday, 24 August 2011
धोनी ने अन्ना को बोला, शुक्रिया!
गुस्ताखी माफ के इस शो में महेन्द्र सिंह धोनी ने टीम की हार से लोगों का ध्यान हटाने के लिए अन्ना का शुक्रिया अदा किया है।
Tuesday, 23 August 2011
I am still fit to fight the battle: Anna
Dispelling all rumours of his health failing, the Gandhian activist says, "I won't give up till we achieve our goal.
Monday, 22 August 2011
अण्णांनी निवडणूक लढवून दाखवावी
कॉंग्रेसचे खासदार महेश जोशी यांचे आव्हान
जयपूर - जयपूर येथून निवडणूक लढविण्याचे आव्हान खासदार महेश जोशी यांनी अण्णा हजारे यांना दिले आहे. ""अण्णांनी निवडणूक लढविण्याची हिम्मत दाखविली, तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्यास तयार आहे. कोणाला किती लोकांचा पाठिंबा आहे, हे तेव्हाच कळेल,'' असे जोशी यांनी म्हटले आहे.
""चांदणी चौक या मतदारसंघातील 85 टक्के लोक कपिल सिब्बल यांच्या विरोधात आहेत, असा दावा अण्णा करतात; मग त्यांच्याविरुद्ध ते का लढत नाहीत,'' असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला आहे. जोशी हे कॉंग्रेसचे खासदार आहेत. त्यांच्या निवसस्थानी अण्णांच्या समर्थकांनी आज घेराओ घातला व तुम्ही पक्षाबरोबर आहात की जनतेबरोबर, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी पक्षाबरोबर असल्याचे उत्तर दिले.
""कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात जनलोकपाल विधोयकाबाबत काहीही म्हटले नव्हते. जनता त्याचे समर्थन करण्यासाठी सांगू शकते; परंतु ते आमच्यावर बळजबरी करू शकत नाहीत. आम्ही निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली नसतील तर जनतेची माफी मागण्याचीही तयारी आहे,'' असे जोशी म्हणाले.
""आपण कधी भ्रष्टाचार केला नाही व भविष्यात करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र आंदोलनला पाठिंबा देणाऱ्या भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षांकडून हजारे यांनी लिहून घ्यावे,'' असे आवाहनही जोशी यांनी केले.

पुण्यातील तरुणाईचा अण्णांना अनोखा पाठिंबा
याबद्दल ई-सकाळशी बोलताना अयुबखान पठाण म्हणाले, "अण्णांना पाठिंबा द्यायचाच हे आम्ही पक्के ठरविले होते. अशातच आम्हाला ही कल्पना सुचली. आमचे स्वतःचे इलेक्ट्रिकल्सचे दुकान असल्याने, आम्ही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या छोट्या "एलईडी' दिव्यांच्या साह्याने आमच्या शर्टावर "आय एम अण्णा' अशी अक्षरे लिहिली आहेत.''
"अलाईट इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉलिक्स'चे आयुबखान पठाण व इमरानखान पठाण या काका-पुतण्यांनी मिळून "सोलर एलईडी लाईटिंग' तयार केले आहेत. सौर ऊर्जेवर चालणारे हे दिवे त्यांनी त्यांच्या शर्टावर केले आहे. हे शर्ट परिधान करून दोघे जण शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अण्णांना त्यांच्या आंदोलनात पाठिंबा देत आहेत.
या दोघांची ही अनोखी कल्पना सर्वांनाच खूप आवडली व ते जातील तिथे लोकांनी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला, असा दावा पठाण यांनी केला. या दिव्यांची क्षमता विचारली असता पठाण म्हणाले, "सुमारे दोन तास सौरऊर्जेवर "चार्जिंग' केल्यानंतर सुमारे 32 तास हे दिवे चालू राहतात.'' या दोघांच्या शर्टवर दिव्यांच्या साह्याने राष्ट्रध्वज, अण्णा हजारे यांचा फोटो तसेच "आय एम अण्णा' असे लिहिले आहे.
Subscribe to:
Comments (Atom)